25 फेब्रुवारी स. 10 ते संध्या 4 वा. सद्गुरू भालचंद्र विद्यालय. शाळा क्रं 3 येथे मोफत कार्यशाळा
कणकवली (प्रतिनिधी) : दिशा फाऊंडेशन च्या वतीने कणकवली येथे गणित व बुद्धिमत्ता मोफत कार्यशाळेचे आयोजन 25 फेब्रुवारी स. 10 ते संध्या 4 वा. सद्गुरू भालचंद्र विद्यालय. शाळा क्रं 3. कणकवली येथे करण्यात आले आहे. 10 वर्षांवरील कुणीही विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.
हि कार्यशाळा ऑलिंपियाड, स्कॉलरशिप, नवोदय, बीडीएस, आयटीएस, मंथन, प्रावीण्य, प्रज्ञाशोध तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. गणित व बुद्धिमत्ता मोफत कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत वही, पेन, पाणी व टिफीन घेऊन यावे. तसेच शक्य असल्यास पालकांनी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित रहावे. असे आवाहन दिशा फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व्हाट्सअप क्रमांक 9175134913 / 8180557035 वर संपर्क साधावा.











