पूण्यातील दोन युवक तारकर्ली समुद्रात बुडून ठार, एकाची प्रकृती गंभीर

मालवण (प्रतिनिधी) : एमटीडीसी तारकर्ली यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान तारकर्ली समुद्रात 5 युवक तारकर्ली यांचेकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान तारकर्ली समुद्रात 5 युवक पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील 3 युवक पाण्यात बुडाले.बुडालेल्या युवकांना बचाव पथकाने बाहेर काढून अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मालवण येथे दाखल केले.

ग्रामीण रुग्णालय, मालवण येथील वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्राप्त माहिती नुसार सदर 3 युवकांतील (१)शुभम सुशील सोनवणे, वय वर्षे 22, राहणार हडपसर, पुणे,(२)रोहित बाळासाहेब कोळी, वय वर्षे 21, राहणार हडपसर, पुणे हे मयत झालेले असून (३)ओंकार रामचंद्र भोसले, वय वर्षे 23, पुणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे संदर्भित करण्यात आलेले आहे.

सदर घटनेतील ओंकार भोसले या युवकाला जिल्हा रुग्णालय ऐवजी डॉ.अविनाश झाटये यांचे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालय मालवण यांनी दिली. डॉ.अविनाश झाटये यांचेकडून प्राप्त माहिती नुसार सदर मुलाची ऑक्सिजन लेव्हल अद्याप वाढलेली दिसत नाही. त्यामुळे अद्यापही रुग्ण धोक्याच्या बाहेर आहे असे म्हणता येणार नाही

error: Content is protected !!