करुळ वैभववाडी परिसरातील युवकांना -नागरीकांना रक्तदान शिबीरात सहभागी होण्याचे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाशिवरात्री निमित्त रामेश्वर मंदिर करूळ, वैभववाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. करूळ गावातील तरुण मंडळी,सर्व ग्रामस्थ व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत रामेश्वर मंदिर करुळ येथे शिबीर संपन्न होणार आहे. तरी वैभववाडी व करूळ परिसरातील तरुणांनी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व करुळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











