तळेरे (प्रतिनिधी) : पी.एम. जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २३ व २४ फेब्रुवारी रोजी प्रशालेत आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत खाद्य जत्रा, तसेच दुपारी २ ते ५ वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. तर सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते १ वाजता वेशभूषा स्पर्धा आणि सायं.६.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर हे असणार आहेत. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं.स.सभापती दिलीप तळेकर तसेच माजी जि.प. सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर, साळीस्ते केंद्र प्रमुख गोपाळ गवस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांना पालकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक महेंद्र पावसकर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी केले आहे.