कांदळगाव वाचनालय येथे भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

मसूरे (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव, तालुका मालवण या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत मराठी राजभाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल सर्व मराठी भाषिकांमध्ये मध्ये एक आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. मराठी ही राजभाषा असून तिचं संवर्धन आणि अधिकाधिक लेखन होण्याच्या उद्देशाने तसेच मराठी भाषा निरंतर टिकून राहावी यासाठी मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करण्याच्या उद्देशाने व वाचकांमध्ये मराठी भाषेविषयी जाणीव जागृती आणि रुची निर्माण करण्याच्या उद्देशाने ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त भव्य अशा ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या ग्रंथ प्रदर्शनामध्ये मराठी विषयावरील विविध प्रकारचे साहित्य प्रत्यक्ष पहावयास आणि त्याचे वाचन करावयास मिळणार आहे. तरी मराठी भाषेचे हे सौंदर्य पाहण्यासाठी सर्व मराठी वाचकांनी ग्रंथालय प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!