कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना सचिव तथा आमदार वरुण सरदेसाई व शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांनी रविवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार पदी निवडून आल्याबद्दल वरुण सरदेसाई यांचा व ईडीच्या कारवाईला न झुकणाऱ्या सुरज चव्हाण यांचा वैभव नाईक यांनी सत्कार केला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, कलमठ ग्रा. प. सदस्य धीरज मेस्त्री, विलास गुडेकर, सिद्धेश हुन्नरे, निश्चय हुन्नरे आदी उपस्थित होते.













