खारेपाटण येथे तालुका विधी सेवा समितीच्या वतीने लोक अदालत संपन्न

दिवाणी न्यायधीश टी एच शेख यांची प्रमुख उपस्थिती

लोकअदालत मध्ये ११ प्रक्रणापपैकी ३ प्रकरणे निकाली

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आज गुरवार दी.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यलय खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल व्हन लोक अदालातीचे उद्घघाटन कणकवली तालुका दिवाणी न्यायधिश टी एच शेख यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी त्यंचेस्मवेत ऍडव्होकेट मिलिंद सावंत,वकीलपाटील वकील सातवसे, वकील राणे,वकील अजिंक्य देवस्थळी आदी प्रमुख पॅनल सदस्य उपस्थित होते.

खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या लोकअदालत कार्यक्रमात एकूण ११ न्यायालयीन प्रकरणापैकी ३ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यावेळी खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव,ग्रा.पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, दक्षता सुतार,ऍडव्होकेट व ग्रा.पं. सदस्या शितिजा धुमाळे, प.पू. भालचंद्र महाराज नागरी सह. पतसंस्था खारेपाटणचे मुख्य कार्य अधिकारी शुभम मोरे, सामजिक कार्यकर्ते नंदू कोरगावकर, संतोष पाटणकर, प्रकाश मोहिरे, प्रा,आ.केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम, खारेपाटण केंद्र शाळेच्या शिक्षिका आरती जेजोन, खारेपाटण हायस्कूलचे पर्यवेक्षक संतोष राऊत, आशा स्वयंसेविका अंकिता कांबळी, माधवी कांबळी, समृद्धी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्राची ईसवलकर याचे शुभहस्ते कणकवली कोर्टाचे न्यायधिक्ष टी एच शेख यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तर उपस्थित सर्व माण्यवरांचे उपसरपंच महेंद्र गुरव यांनी स्वागत केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कणकवली तालुका विधी न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिक एम एम आचार्य, कनिष्ठ लिपिक संतोष पेडणेकर, स्वप्नील सावंत, स्तेनोग्रफर अंजली धुरी, पोलीस कर्मचारी शैलेश म्हेत्रे, तसेच प्रमोद सावंत, बाबासाहेब साबळे आदी कर्मचारी वर्गाने उपस्थित राहून सहकार्य केले.

error: Content is protected !!