चिंदर सडेवाडी प्रशालेच्या स्वानंद सचिन घागरे याला ‘बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड’ !

कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या मार्फत राज्य स्तरीय रंगभरण स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडीचिंदर सडेवाडीच्या कु. स्वानंद सचिन घागरे याला ‘बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड’ प्राप्त झाला आहेत. कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या मार्फत ही राज्य स्तरीय रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. शालेय अभ्यासक्रमां व्यतिरिक्त अन्य स्तरावरील स्पर्धा परीक्षांना मुलांना प्रविष्ठ होण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यां उद्देशाने घेण्यात आलेल्या यां राज्य स्तरीय रंगभरण स्पर्धेत जि. प. प्रा. शा.चिंदर सडेवाडी शाळेमधील विद्यार्थांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

इयत्ता पहिली मधील स्वानंद सचिन घागरे याला बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड मिळाला. तसेच सर्व सहभागी विदयार्थ्याना राज्य स्तरीय सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विविध स्पर्धेत मुलांचा सहभाग असला पाहिजे. यातून सराव होईल आणि मुलांना शिकता येईल, मुले स्पर्धेच्या युगात खंबीर होतील. असे मत मार्गदर्शक शिक्षिका शुभांगी लोकरे -खोत यांनी यां निमित्ताने व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी, उपाध्यक्ष स्वाती सुर्वे, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड, प्रीती कांबळी, मानसी गोसावी, करिष्मा कानविंदे, स्वरा घागरे, सतीश हडकर, वसंती वसावे, धनश्री गोसावी, अमित मुळे तसेच अन्य पालक व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!