कोळपे सरपंच सुनील कांबळें विरोध अविश्वास ठराव नोटीस

कोळपे ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे दिली नोटीस

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळपे ग्रामपंचायत सरपंच सुनील कांबळे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव नोटीस वैभववाडी तहसीलदार यांच्याकडे आज दिली आहे. या नोटीस पत्रावर तौफिक रमजान लांजेकर, समीर गुलाब चोचे , विलास माने, रजिया ठाणगे, दिलीप कांबळे, शुभांगी कांबळे, महीराज थोडगे, सकीना लांजेकर यांच्या सह्या आहेत. नोटीस मध्ये म्हटले आहे की, कोळपे सरपंच विकासकामांत विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, ग्रामपंचायत सदस्यांना उद्धट शब्दाने बोलतात. वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव नोटीस कोळपे ग्रामपंचायत सदस्यांनी दिली असून याबाबत पुढे काय होते याकडे कोळपेवसीयांचे लक्ष आहे.

error: Content is protected !!