खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण आयोजित व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण पुरस्कृत भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते व सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. क्रिकेट स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून दि. १ मार्च ते ३ मार्च अशी सलग तीन दिवस ही स्पर्धा चालणार आहे.
श्री केदारेश्वर मैदान खारेपाटण च्या भव्य पटांगणावर भरविण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार संतोष पाटणकर, मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र कदम, खजिनदार संदीप पाटणकर, प्रथमेश कदम सल्लागार अशोक पाटणकर, मधुकर पाटणकर तसेच पंचशील क्रिकेट क्लब चे युवा कार्यकर्ते मकरंद पाटणकर, भूषण गोवळकर, ललित पाटणकर, आशिष पोमेडकर, कुणाल पाटणकर, प्रियाल पवार, राहुल पाटणकर, हर्षल कदम, पार्थिव पाटणकर, बाळकृष्ण पाटणकर, दीपक गोवळकर, संतोष मधुकर पाटणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विनोद शंकर पाटणकर यांनी पुरस्कृत केले असून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सचिन श्रीधर पाटणकर यांनी पुरस्कृत केले असून अंतिम विजेता संघाला रोख रुपये २००००/- व आकर्षक चषक तसेच उपविजेता संघाला रोख रुपये १०००० /- रुपये व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शेत्ररशक व मालिकावीर आदी खेळाडूना आकर्षक चषक देऊन गौरवीन्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटणच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सरपंच प्राची ईसवलकर व मंगेश गुरव यांनी क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा दिला व पंचशील क्रिकेट क्लबच्या सुंदर आयोजनाचे कौतुक केले.











