महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे निवेदन
प्रशासनाने दखल न घेतल्यास 17 मार्चला आंदोलनाचा इशारा
मसूरे (प्रतिनिधी) : 15 मार्च 2024 च्या अन्यायकारक शासन निर्णया नुसार सन 2024-25 ची संचमान्यता रद्द करून पूर्वीच्याच निकषानुसार संच मान्यता करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती च्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांना देण्यात आले. मागणीची दखल न घेतल्यास 17 मार्चला आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती ने दिला आहे.
नव्या संचमान्यतेनुसार राज्यातील हजारो पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.राज्यातून या संचमान्यतेला विरोध होताना दिसत आहे. अन्यायकारक संचमान्यतेला राज्यभरातील शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने नवी संच मान्यता रद्द करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच प्राथमिक शिक्षकांच्या अनियमित होणाऱ्या पगाराबाबत ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून. विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या मागण्यावर विचार करून तात्काळ कार्यवाही न केल्यास 17 मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर दुपारी 2.00 ते 5.30 या वेळेत आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षक भारती ने दिला आहे.
मागण्या पुढीलप्रमाणे –
2005 पूर्वीच्या शिक्षण सेवकांची डीसीपीएस रक्कम व सहाव्या वेतन आयोगाचे एक ते पाच हप्ते
त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खाती जमा करणे बाबत (12वर्ष प्रलंबित),
निम शिक्षकांची नियुक्ती शासन निर्णयांच्या दिनांकापासून करण्यात यावी व फरक मिळणे बाबत (14 वर्ष प्रलंबित),
पवित्र प्रणाली भरती पूर्वी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षकांचे प्रमोशन करणे बाबत.,
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इंधन व भाजीपाला अनुदान व धान्यदी माल वेळेत मिळण्या बाबत.
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुरी बाबत. (दोन वर्ष प्रलंबित)
2006 ते 5 सप्टेंबर 2018 पूर्वीच्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वेतन वाढ निश्चिती प्रस्तावा बाबत.
माध्यमिक कडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या व तीन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना स्थायी आदेश मिळण्याबाबत.
सन 2019 मधील मंजूर झालेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक मिळणे बाबत.
2005 पूर्वीच्या शिक्षण सेवकांना शासन निर्णयानुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्या बाबत.
महाराष्ट्र दर्शन व प्रवास भत्ते बिले मिळणेबाबत.
चार टक्के सादील अनुदान मिळणे बाबत
जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी क्रीडा स्पर्धा नियोजन व विद्यार्थी उपक्रमाबाबत तसेच शिक्षकांना शाळेत पूर्णवेळ शिकवायला देणे बाबत
शालेय गणवेश काही शाळा ना अद्याप प्राप्त झाले नाहीत त्या बाबतची चौकशी करून गणवेश मिळणे बाबत.
निवड श्रेणी प्रस्तावा बाबत, नवनियुक्त शिक्षकांचे सेवा सातत्य प्रस्तावा बाबत, भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा नियोजना प्रमाणे बीटस्तरीय केंद्रावर घेण्याबाबत, शिक्षण सेवक यांच्या प्रसूती रजेच्या पगारा बाबत शासन निर्णया प्रमाणे कार्यवाही करणे बाबत,
चुकीच्या पद्धतीने काही शिक्षकांची कपात केलेली dcps रक्कम मिळणे बाबत, शिष्यवृत्ती पोर्टल वरील माहिती ज्यांना लागू नाही त्या ही शाळाना सक्तीने भरून घेतली जात असल्याबाबत,
२००६ साली भारती झालेल्या शिक्षण सेवकांची अधिसूचना मिळणेबाबत मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.











