आम. निरंजन डावखरे स्वामी समर्थ चरणी नतमस्तक !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री श्री १०८ महंत प. पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठामध्ये आंगणेवाडी जत्रा कालावधीत २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या भाविकांना सकाळी चहा, नास्ता, दुपारी जेवण तसेच रात्री जेवण मोफत पुरविण्यात आले. बाहेरील गावच्या भाविकांसाठी अंघोळीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. अनेक भक्तांनी या कालावधीत भेट देत स्वामींचे दर्शन घेतले. यादरम्यान कोकण पदवीधर मतदार संघांचे आमदार निरंजन डावखरे यांनी मठास भेट दिली. परमपूज्य श्री गावडे काका महाराज यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचलन श्रीकृष्ण पाटकर यांनी केले. यावेळ संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश किनळेकर, नितिन पि॑गुळकर, बँक ऑफ बडोदा शाखा कणकवली चे दिलिप सुतार, अनिल घाडीगांवकर, भुषण गावडे, कणकवली उपासना केंद्राचे सेवेकरी, मसदे वडाचापाट मठाचे विश्वस्त साईप्रसाद पेडणेकर, तानाजी पाटील, भुषण सावंत, मुणगेकर आदी उपस्थित होते. आभार श्रीकृष्ण पाटकर यांनी मानले.

error: Content is protected !!