सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बँकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला बँकेबद्दल निष्ठा, प्रेम व आपुलकी वाटली पाहिजे. बँकींग सेवा देतांना आपण एकाच कुटुंबाचे घटक असल्याचे समजून ग्राहकांना सकारात्मक दृष्टी ठेवली पाहीजे. भविष्यात बँकींग व्यवसायात प्रगती साधावयाची असेल तर डिजीटल पर्यायांचा वापर करणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेने डिसेंबर २०२४ अखेर ६००० कोटी व्यवसायाचा टप्पा पार पाडला असून येत्या डिसेंबर २०२६ अखेर ८००० कोटी व्यवसायाचा टप्पा सिंधुदुर्ग जिल्हा बँक निश्चित गाठणार असल्याचा ठाम विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केला.
ग्राहकांना बँकींग सेवा देतांना सकारात्मक दृष्टी ठेवली पाहीजे : मनीष दळवी बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचा ओरोस स्नेहमेळावा संपन्न











