पडेल सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पडेल मंडल भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्या सौजन्याने जागतिक महिलादिनी ७ मार्च रोजी रात्री ९ वाजता पडेल तिठा येथे छावा सिनेमाचा खास शो एलइडी स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा सिनेमा सध्या जगभरात गाजत आहे. ग्रामीण भागातील जनतेला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे खास शो मोफत दाखविण्यात येणार आहे.पडेल सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संधेला ७ मार्च २०२५ रोजी होम मिनिस्टर स्पर्धा सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
दि ८ मार्च रोजी निबंध स्पर्धा १ ली ते ४ थी गट, ५ वी ते ७ वी गट, ८ वी व ९ वी गट रस्सीखेच स्पर्धा, खो खो स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा सर्वांसाठी खाऊ गल्ली कार्यक्रम महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पडेल गाव चे सरपंच भुषण पोकळे, उप सरपंच विश्वनाथ पडेलकर व सर्व ग्रा. प. सदस्य व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्या करीत सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.










