सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त दाखविण्यात आला छावा सिनेमा
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण संभाजी नगर येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांच्या वाढ दिवसानिमित्त खारेपाटण एस टी बसस्थानक येथे बुधवार दि.५ मार्च २०२५ या रोजी रात्रौ ९ .३० वाजता सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र गाजत आसलेला छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन चरित्रावर आधारित असलेला ऐतिहासिक “छावा” हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला.
यावेळी खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिक छावा सिनेमा पाहण्यासाठी वाहने घेऊन खारेपाटण मध्ये उपस्थित होते. तर सुमारे १५०० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी व स्थानिक ग्रामस्थानी या सिनेमाचा जवळून पाहण्याचा लाभ घेतला. तसेच छावा चित्रपट पाहण्यासाठी खारेपाटण एस टी बसस्थानक येथे नागरिकांनी मोठी हाऊस फुल्ल गर्दी केली होती. आयोजक श्री सतीश गुरव यांचे नागरिकांनी आभार आभार व्यक्त केले











