वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्याचे मस्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित उबाठा सेनेचे युवा सेना चिटणीस स्वप्नील धुरी, सोनाळी सरपंच भीमराव भोसले, खांबाळे माजी उपसरपंच गणेश पवार यांच्यासह उबाठा सेनेच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचे पालकमंत्र्यांनी स्वागत केले.त्यामुळे वैभववाडीतील उबाठा सेनेला मोठे खिंडार पडले असून पालकमंत्री राणे यांनी उबाठा सेनेला जोरदार धक्का दिला आहे.
पालकमंत्री राणे वैभववाडी दौऱ्यावर आले असता, भाजपा कार्यालयात हे पक्ष प्रवेश घेण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, दिलीप रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, संजय सावंत, रवींद्र रावराणे, रितेश सुतार, प्राची तावडे, श्रद्धा रावराणे, शारदा कांबळे, सीमा ननिवडेकर, स्नेहलता चोरगे, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
उबाठा चे स्वप्नील धुरी यांनी शुक्रवारी उबाठा सेनेचा राजीनामा दिला होता. त्यांनी तिथवली सोसायटी संचालक जयराज हरियाण, संचालक चंद्रकांत धुरी, ग्रामपंचायत सदस्य चित्रा हरियाण, सायली धुरी, गणेश पवार, कोळपे जि. प. युवा सेना विभाग प्रमुख राजेश पवार, युवा सेना उपतालुकाप्रमुख सत्यवान सुतार, दिगशी शाखाप्रमुख देवेंद्र पाष्टे, युवासेना उपविभाग प्रमुख जयेश पवार, नरेंद्र धुरी, सागर पवार, रवींद्र पाटील, राहुल धुरी, यांच्यासह मोठया संख्येने उबाठाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
तसेच सोनाळी सरपंच भीमराव भोसले यांच्या भाजपा प्रवेशामुळे आणखी एक ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली आहे. तर खांबाळे माजी उपसरपंच गणेश पवार यांनी जयेश पवार, गणेश पवार, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला. त्यामुळे हा उबाठा सेनेला मोठा धक्का मानला जात असून उबाठा सेनेला मोठे खिंडार पडले आहे.












