जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलीसांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

ओरोस (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या पाच षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा पोलिस परेड मैदानावर पार पडली. या स्पर्धेमध्ये गोल्डन ईगल्स संघ विजेता तर रॅपिड स्ट्रायकर्स या संघ उपविजेता ठरला. मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून काशी पाटकर यांना तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रतीक्षा कोरगावकर यांना सन्मानित करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार ह्या आपले कौटुंबिक आयुष्य सुखकर ठेवून पोलीस दलाचे दैनंदिन कर्तव्य मोठ्या जबाबदारीने पार पाडत असतात. त्यांचे मनोबल वाढविणे तसेच त्यांचेसाठी खेळ आयोजीत करुन ताण-तणाव मुक्तीसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेणे हा हेतु विचारात घेवुन ८ मार्च ह्या जागतिक महिला दिनाचे निमीत्ताने जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे संकल्पनेतुन पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथील मैदानावर महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या महिला क्रिकेट स्पर्धेकरीता सिधुदुर्ग जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्स्फुर्तरित्या प्रतिसाद दिला.

महिला क्रिकेट स्पर्धेकरीता ७ संघ सहभागी झालेले होते. त्यामध्ये स्पोटर्स ११, प्लॅटीनम पॅन्थर्स, पॉवर रेंजर, गोल्डन इगल्स, अरेबियन वॉरीयर्स, अॅव्हेन्जर्स ११, रॅपीड स्ट्रायकर्स अशा संघानी ५-५ ओव्हर्सच्या लिमिटेड महिला क्रिकेट सामने रंगविण्यात आले. या क्रिकेट स्पर्धा आयोजीत करणेकरीता पोलीस अधीक्षक यांचे सोबत स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षण राजेंद्र पाटील, सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, महिला कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांनी सहभाग घेतलेला होता. तसेच या क्रिकेट स्पर्धेकरीता पंच म्हणुन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मागाडे, पोलीस उपनिरीक्षक श्री, गाडेकर, समीर भोसले, सुरज पाटील, सागर शिंदे यांनी महत्वाची भुमीका बजावली. त्याचप्रमाणे वैद्यकिय उपचाराकरीता डॉ. श्रीम. विना गोविंदवार ह्या देखील उपस्थित होत्या.

या महिला संघामध्ये पहिल्या मॅच पासुनच चुरशीची लढत पाहावयास मिळाली त्यामध्ये उत्कृष्ट फंलदाजी केल्याबद्दल काशी पाटकर व उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल प्रतिक्षा कोरगांवकर यांना बक्षीस मिळाले तसेच सर्व सामन्यामंध्ये उत्कृष्ट फलंदाजी केल्यामुळे मालिकाविर होण्याचा मान काशी पाटकर यांना पुन्हा एकदा मिळाला. त्याचप्रमाणे ७ संघामध्ये गोल्डन ईगल्स संघ विजेता झालेला असुन त्या संघाचे कर्णधार सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांनी बक्षीस स्विकारले. तसेच उपविजेता संघ म्हणून रॅपिड स्ट्रायकर्स या संघाने मान मिळवला. दोन्ही संघाना व इतर पोलीस अंमलदार यांना पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे हस्ते बक्षीसे देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक यांचे आभार मानून त्यांनी क्रिकेट स्पर्धा आयोजीत करुन महिला दिन साजरा केला म्हणुन सकारात्मक प्रतिसाद देवून समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!