ॲड. राजेंद्र रावराणे जगात भारी आम्ही कोल्हापुरी पुरस्काराने सन्मानित

जेष्ठ सिने अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक आले गौरविण्यात

कणकवली (प्रतिनिधी) : जेष्ठ सिने अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते जेष्ठ विधीज्ञ राजेंद्र रावराणे यांना व्यंकटेश्वरा प्रकाशन कोल्हापूर या संस्थेतर्फे दिला जाणारा “जगात भारी आम्ही कोल्हापुरी” हा पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथे देवल क्लब नाट्यगृहात प्रदान करण्यात आला.यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, संस्थाध्यक्ष संजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.व्यंकटेश्वरा प्रकाशन ही सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून पुणे कोल्हापूर येथे कार्यरत आहे.सन 2008 पासून या संस्थेच्या वतीने उद्योग व्यवसायात माईलस्टोन ठरलेल्या व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. पुढील पिढीला प्रेरणा मिळून त्यांनी आपले कार्य करावे ह्या उद्देशाने पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ऍड. राजेंद्र रावराणे हे मागील 36 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत.अत्यंत हुशार आणि आपल्या अशिलांना न्याय मिळवून देणारे वकील म्हणून ते सुपरिचित आहेत. ऍड.रावराणे यांचे लॉ चे शिक्षण हे शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथे पूर्ण झाले असून सनद मिळविल्यानंतर त्यांनी आपल्या वकिली पेशाची सुरुवात देखील कोल्हापूर मध्ये केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वकिली पेशात नावलौकिक मिळविलेले ऍड. राजेंद्र रावराणे हे कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील शंकर महादेव विद्यालय हायस्कुल संस्थेचे ट्रस्टी असून स्कुल कमिटी चेअरमन आहेत. तसेच कणकवली रोटरी क्लब सेंट्रल चे ते सक्रिय सदस्य आहेत. आपली दिवंगत आईच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या कै. मायादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांगाना, गरजू होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त शिक्षक यांचा सन्मान करत सामाजिक कार्य करत आहेत.

error: Content is protected !!