पेंडूर येथे संजय नाईक स्मृती दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद!

संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान आणि ब्युटिज ऑन व्हील्सच्या वतीने आयोजन

मसूरे (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना व्यायामाविषयी गोडी लागावी तसेच शरीर निरोगी आणि सुदृढ रहावे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नुकतेच स्थापन झालेले संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान आणि ब्युटिज ऑन व्हील्स यांच्या संयुक्त विद्यमाने संजय नाईक स्मृती दौड ( रन) चे आयोजन पेंडूर येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. बापू परब सुकळवाड यांच्या ह्स्ते श्रीफळ वाढवून आणि महेश नाईक यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कट्टा वराडकर हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कुल पेंडूरचे मिळून एकूण १७० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.संजय नाईक यांचे प्रेरणास्थान ते ग्रामीण रूग्णालय पेंडुर कट्टा आणि ग्रामीण रुग्णालय ते पुन्हा संजय नाईक प्रेरणास्थळाकडे ही दौड समाप्त करण्यात आली.

यावेळी संजय नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश नाईक,श्रावणी नाईक,सारंगी सानिया नाईक,यश नाईक,राजन नाईक,संपूर्ण नाईक परिवार,उपाध्यक्ष डॉक्टर सोमनाथ परब, सदस्य संजय पेंडूरकर अमित सावंत , सुमित सावंत, सुशील राणे, दीपा सावंत,तसेच ब्युटीज ऑन व्हीलस ग्रुपचे डॉ जी. आर सावंत, निलेश झाटये, सुरेश कांबळी, गणेश पारकर ,सोनू पारकर, रुपेश भोजने ,बंडू माडये, निरज माडये राजेश प्रभुलकर,सतीश कांबळी,अनिल पाटील,प्रकाश सरमळकर, जगदीश पेंडूरकर,अमोल आळवे तसेच कट्टा वराडकर हायस्कूलचे शिक्षक श्री भाट, श्री गावडे, श्री वाजंत्री, समिर चांदरकर,न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचे मुख्याध्यापक श्री तावडे, तसेच अर्जुन पेंडूरकर,पपू चव्हाण ,पिंटू वालावलकर,राजा पेंडूरकर,आणि संजय नाईक मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची रुपरेषा डाॅ.सोमनाथ परब आणि गौरव नाईक यानी मांडली आणि अध्यक्ष महेश नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!