पूर्वा खाडीलकर व्दितीय, संग्राम कासले तृतीय तर रणजीत पाटील व प्रसाद खडपकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक
कै. दादा ठाकूर स्मृती कै गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबकचे आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा नुकतीच जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीम प्रणिता राऊळ- वेंगुर्ला, श्रीम. पूर्वा खाडिलकर व्दितीय क्रमांक – सावंतवाडी, संग्राम कासले तृतीय क्रमांक – मालवण, तर उत्तेजनार्थ रणजीत पाटील – देवगड, प्रसाद खडपकर – कुडाळ यांनी प्राप्त केला.
विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम रु. 2000, द्वितीय रु. 1500, तृतीय रु.1000 अशा रोख स्वरूपाच्या रक्कमांसहित सन्मान चिन्हे पारितोषिक म्हणून देण्यात आले. उत्तेजनार्थ क्रमांकांना सन्मानचिन्हे देऊन तर सहभाग उत्तेजनार्थ म्हणुन सर्वश्री श्रीम. सायली म्हाडगुत,दिव्या परब, श्रीम. आशा मोहिते व श्री. सुजय जाधव यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश शामराव ठाकूर-गुरुजी, (अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण) हे होते, वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन संजय शिंदे, (ग्रंथपाल नगर वाचन मंदिर मालवण ) यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून गुरुनाथ ताम्हणकर सर (पदवीधर शिक्षक मसुरे ) व संजय शिंदे मालवण यांनी काम पाहिले. उद्धाटन सोहळ्याचे प्रास्ताविक सुरेंद्र सिताराम सकपाळ अध्यक्ष कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक यांनी केले. प्रास्ताविकामध्ये बोलतांना स्पर्धेची रूपरेषा आणि स्पर्धेचे नियम उपस्थित स्पर्धकांना समजावून सांगितले.
पारितोषिक वितरण सोहळा सुरेश ठाकूर- गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, त्यांनी स्पर्धेचे कौतुक करताना सांगितले की कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्या या वक्तृत्व स्पर्धेचे संयोजन आणि नियोजन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मार्गदर्शक असे झाले. कार्यक्रमासाठी अमेय लेले, ग्रंथपाल, बंडू जाधव, सहाय्यक ग्रंथपाल व श्रीम. चैताली सुतार यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ गायकवाड यांनी केले.











