२४ वर्षीय युवकाची तरंदळेत आत्महत्या

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सिद्धेश भरत सावंत (वय २४, रा. तरंदळे पटेलवाडी ) याने ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी बाराला गळफास लावून घेत आत्महत्या केली. याबाबत ची खबर सत्यवान लक्ष्मण राणे ( तरंदळे, पटेलवाडी ) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. मयत सिद्धेश हा मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची फिर्याद मुंबई मुंबई मेघवाडी पोलिस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

error: Content is protected !!