फोंडा – गांगोवाडी चे सुपुत्र संतोष सावंत -पटेल यांची पोलीस सेवेत उपनिरीक्षक पदी निवड !

गांगोवाडी मध्ये कौतुकाचे वातावरण

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट गांगो वाडी येथील रहिवासी, तसेच मुंबई मंडळाचे माजी सचिव- सदस्य, संतोष शांताराम सावंत- पटेल यांची, नुकतीच पोलीस सेवेत उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली. याबद्दल गांगोवाडी मधील ग्रामस्थांकडून, श्री देव वाघोबा क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळाचे अनंत सावंत आणि साईनाथ प्रसादीक भजन मंडळाचे हरिश्चंद्र घाडगे यांचे कडून संतोष यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. पोलीस सेवेमध्ये खडतर परिश्रमाने भरती झाल्यानंतर, त्यांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पडली.त्याचबरोबर गांगोवाडी मुंबई मंडळामध्ये, सामाजिक कार्यात त्यांचे योगदान लक्षणीय असते. आपली गाव- वाडी आणि मुंबई मंडळासाठी, तसेच पोलीस सेवेत आदर्श काम करणाऱ्या संतोष यांचा दसरा संमेलनात मंडळाचे वतीने जाहीर सत्कार करण्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

error: Content is protected !!