जयश्री खाडिलकर यांना डॉक्टरेट पदवी !

मसुरे (प्रतिनिधी) : आर.पी.बागवे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी जयश्री सदाशिव खाडिलकर हिला आय.सी.टी.माटूंगा च्या १४ व्या दीक्षांत समारंभात कुलसचिव प्रा. अनिरूध पंडित यांच्या हस्ते बायोकेमेस्ट्री विषयात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. मसूरे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी तसेच हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी तीचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!