कणकवली येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सामाजिक कार्यकर्ते उत्तम धुमाळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त युवासेनेकडून आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते उत्तम धुमाळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त रविवारी कणकवली येथील श्री चौंडेश्वरी सभागृहात युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे यांच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात ३२ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी शिवसेनेनेचे उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, खजिनदार भास्कर राणे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, प्रमोद मसुरकर, डॉ. विद्याधर तायशेट्ये, कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अबीद नाईक तसेच उत्कर्षा धुमाळे यांच्यासह धुमाळे कुटुंबीय व अन्य नागरिक उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्त पेढीचे डॉक्टर व कर्मचारी यांनी रक्त संकलित केले. तर डॉ. अशोक कदम यांनी नेत्र तपासणी केली. डॉ. हर्षदा माळवदे-करंगुटकर यांनी दंत चिकित्सा केली.

यावेळी दत्ता सामंत व संजय आग्रे यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढील काळात मेहुल धुमाळे व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजोपयोगी विविध उपक्रम राबवावेत. शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ब्रीद अंगिकारावे असे आवाहन केले. तसेच आपले समाजोपयोगी उपक्रमाना नेहमीच सहकार्य राहील असे सांगितले.

error: Content is protected !!