मृगाक्षी हिर्लेकरला इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा !

मसूरे (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा सन 2022-23 मधून देवगड तालुक्यात इयत्ता 7 वी मधून कुमारी मृगाक्षी मंगेश हिर्लेकर हिने द्वितीय क्रमांक पटकवला होता. त्याबद्दल तिची निवड इस्रो सहलीसाठी झाली होती. ही सहल 18 मार्च ते 23 मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे. यासाठी तिला प्रशालेमार्फत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, जी. एस. तवटे, एच. एस. महाले, पी. एन. बागवे, आर. आर. कुमठेकर, एस. एस. नार्वेकर, एम. व्ही. मुणगेकर, एन एल बागवे. एस. व्ही. कांदळगावकर आणि विध्यार्थी उपस्थित होते. जी प शिक्षक मंगेश हिर्लेकर आणिमिताली हिर्लेकर यांची ती कन्या आहे. तिच्या यशाबद्दल हिंदळे व मुणगे गावातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!