राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट सांगुळवाडी च्या वतीने कुंभवडेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट सांगुळवाडी च्या वतीने गुरुवार २० मार्च रोजी वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कुंभवडे ग्रामपंचायत च्या सभागृहात २० मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिर तपासणीमध्ये मधुमेह, ब्लड प्रेशर, इसीजी आदी तपासण्या मोफत केल्या जाणार असून ताप सर्दी खोकला व अन्य आजारांवर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन कुंभवडे ग्रामपंचायत व राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!