जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी आणणार – अबिद नाईक
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या महाराष्ट्र राज्यात सभासद नोंदणी करण्याच्या धोरणानुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी राष्ट्रवादी तालुका कार्यालय येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी जिल्हा कार्यकारिणी सभा घेऊन सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ केला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन हजार सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले त्याचबरोबर दर महिन्याला प्रत्येक तालुक्याची कार्यकारिणी घेण्यासाठी तारखां निश्चित करण्यात आल्या जिल्हाध्यक्ष अबिद नाईक मार्गदर्शन करताना प्रत्येक तालुकाध्यक्ष यानी गावागावात जाऊन सभासद नोंदणी करण्याच्या सूचना केली त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर यानी संघटना वाढीसाठी सर्वांनी आपल योगदान देणे गरजेचे आहे असे सांगितले, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे यानी पक्ष संघटना वाढविण्यासाठी सांघिक काम करा असे सांगितल प्रदेश चिटणीस सुरेश गवस यानी पक्षाच्या कामात कुठल्याही पदाधिकारी यानी प्रामाणिक काम करा













