एसपी अग्रवाल यांच्याकडून आचरा पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी

ओरोस (प्रतिनिधी) : आचरा पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास गतिमान करा. गुन्हयांची विहित वेळेत निर्गती करा. गुन्हयांची प्रभावी दोषसिद्धी होण्यासाठी प्रगती करा. कायद्यामध्ये झालेल्या नवीन बदलांबाबत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञानासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांनी ऑनलाईन ई लर्निंग व शासकीय अॅपव्दारे प्रशिक्षण पूर्ण करवे, अशा सुचना जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी 19 मार्च रोजी आचरा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी घेतली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखडयास अनुसरुन पोलीस ठाण्याचे आधुनिकीकरण तसेच इमारत व संपूर्ण परिसर सुशोभिकरण कामकाजाचा आढावा घेवून आवश्यक त्या सुचना दिल्या. त्याचपमाणे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दरबार (एकत्रित बैठक) घेवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.

आचरा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गाव पोलीस पाटील यांची बैठक घेवून गावात त्रासदायक, सामाजिक धोकादायक असणारे व्यक्ती, रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या हालचाली, गावातील सार्वजनिक समस्या, धार्मिक व सामाजिक विषयांशी संबंधित माहिती, सण, यात्रा, परंपरा, अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रम इत्यांदीची माहिती पोलीस ठाण्यात देणेबाबत तसेच गावात राहणारे परप्रांतिय व्यक्तींच्या कामगारांच्या परिपूर्ण नोंदी पोलीस ठाण्यामध्ये करण्याच्या सुचना दिल्या. सागरी सुरक्षा व पर्यटकांच्या सुरक्षिततेवर योग्य प्रकारे लक्ष केंद्रित करणे, पर्यटकांना पोलीसांची तात्काळ मदत होणे, सागरी किनारी धोक्याच्या ठिकाणी संबंधित विभागांशी, मच्छीमार संघटना, सागर रक्षक, ग्राम रक्षक यांचेशी योग्य समन्वय ठेवून सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्याही सुचना यावेळी अग्रवाल यांनी दिल्या.

आचरा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांसाठी दर शनिवारी तक्रार निवारण दिन, पोलीस पाटील, ग्रामसरक्षक, सागर सुरक्षा दल, मच्छीमार संघटना, पर्यटक व्यवसायिक संघटना, महिला दक्षता समिती, शांतता व मोहल्ला कमिटी, अन्य सामाजिक संस्था व संघटना यांची महिन्यातून 1 वेळा, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या महिन्यातून 2 वेळा बैठका घेण्याच्या सुचना अग्रवाल यांनी दिल्या.

नागरिकांना आवाहन
सिंधुदुर्ग पोलीस दलाचे Facebook – https://www. facebook.com/ Sindhudurg Police07/, Website https://www.sindhudurgpolice.gov.in/, Instagram https://www.instagram.com/spsindhudurg/, X (Twitter) https://x.com/Sindhudurg SP, Sindhudurg Police Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029VaJ2ugi2975EmoT2bn1E, YouTube Channel https://www.youtube.com/@ Sindhudurg Police यावर नागरिकांनी भेट देवून आवश्यक माहिती व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी केले. तसेच, पोलीस दलाची आपत्कालीन हेल्पलाईन 112, कोस्टल हेल्पलाईन 1093, सायबर क्राईम हेल्पलाईन 1930, सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन 7036606060, पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग व्हॉटस्अप नं. 8275776213 यावर पोलीस मदतीची सुविधा उपलब्ध आहे, अशीही माहिती दिली.

error: Content is protected !!