तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे येथे रंगपंचमी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात बुधवारी साजरी करण्यात आली. यावेळी लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला.
होळी सण आणि रंगपंचमी यांचे अतूट नाते आहे. अलीकडे सगळे हायटेक होत असताना मात्र कोकणात आपल्या परंपरा आणि कला तेवढ्याच जबाबदारीने जोपासल्या जात आहेत. तळेरे येथेही रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते.
तळेरे येथे बुधवारी सर्वत्र रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी आनंदी आणि धार्मिक वातावरण होते.











