अवैध दारूविक्रीप्रकरणी तेजस भांबुरेवर गुन्हा दाखल

१२ हजार रुपयांची अवैध दारू जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीप्रकरणी तेजस भांबुरे ( रा. तळेरे बाजारपेठ ) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासार्डे आनंदनगर बंडवाडी ते वैभववाडी रोडलगत गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करत असताना तेजस भांबुरे याला कासार्डे दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, कॉन्स्टेबल स्वप्निल जाधव यांनी रंगेहाथ पकडले.तेजस भांबुरे याच्या ताब्यातून १२ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई १८ मार्च सायंकाळी ५ वाजताकासार्डे आनंदनगर बंडवाडी ते वैभववाडी रोडलगत करण्यात आली. याबाबत कॉन्स्टेबल स्वप्निल जाधव यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी तेजस विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत.

error: Content is protected !!