गांगेश्वर मित्र मंडळ व चानी जाधव मित्रमंडळ यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – पालकमंत्री नितेश राणे

गौरव स्पोर्ट्स सावंतवाडी संघ कै रणजित पाटील स्मृती चषकाचा मानकरी

कणकवली (प्रतिनिधी) : गांगेश्वर मित्र मंडळ व चानी जाधव मित्रमंडळ यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या मित्रांच्या आठवणीं जपत सामाजिक क्षेत्रात देखील उल्लेखनीय काम हे मंडळ करत आहे. कै रणजित पाटील प्रीमियर लीग च्या माध्यमातून वेगळी स्पर्धा बघण्याची संधी जिल्हावासियांना मिळते. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळन तेवढं सोपं नाही मात्र जिल्ह्यातील अनेक खेळाडू या खेळात चमकत आहेत. ओपन ग्राउंड पेक्षा हया मैदानात खेळण खूप अवघड आहे आणि तुम्ही सर्व खेळाडू अतिशय चांगला खेळ करत आहात. असे गौरवोदगार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.

गांगेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत व चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै रणजित पाटील प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम दिवशी पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पर्धेला भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहर अध्यक्ष आण्णा कोदे, चानी जाधव, बेळणे सरपंच अविनाश गिरकर, उमेश नाडकर्णी, गौरव मुंज, गणेश तळगावकर, योगेश ताम्हणेकर, सिद्देश तळगावकर, अभि साटविलकर, योगेश जाधव, रोशन जाधव, रोहीत जाधव, रुपेश मोरे, गौरव सुतार, विनय परब, यश परब, सुरज कदम, कृष्णा मडव, आदी उपस्थित होते. तर या स्पर्धेला शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, युवा जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, विशाल कामत, रमेश जोगळे, अरुण जोगळे, आनंद भानुशाली, विनय महाडिक, जय शेट्ये यांनी भेट दिली.

स्पर्धेचा विजेता गौरव स्पोर्ट्स सावंतवाडी तर उपविजेता ए जी स्पोर्ट्स कणकवली ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. कै. रणजित पाटील प्रीमियर लीगचा मालिकावीर ए जी स्पोर्ट्सचा निशांत तांडेल ठरला तर फलंदाज म्हणून प्रतीक पाटील ( गौरव स्पोर्ट्स ) गोलंदाज – साहील गोलंदाज ( ए जी स्पोर्ट्स ) यष्टीरक्षक – यशवंत गाड, क्षेत्ररक्षक प्रथमेश देसाई, उगवता तारा – यश नाईक व अंतिम सामना सामनावीर यशवंत गाड ( सर्व गौरव स्पोर्ट्स ) यांना आकर्षक स्मार्ट वॉच व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत समालोचक म्हणून बादल चौधरी, विवेक परब, उमेश परब, साहील वाळवे यांनी काम पहिले तर गुणलेखक म्हणून योगेश मेस्त्री यांनी काम पहिले.

error: Content is protected !!