सासोली येथे इंडियन ह्यूम पाईप कंपनी, व एम डी इन्फ्राट्रकचर कंपनीचे पाईपलाईन चे काम बेकायदेशीर

माजी सैनिकाच्या मुलाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सासोली येथे पाईप लाइन टाकण्याचा ठेका दिलेल्या इंडियन ह्यूम पाईप कंपनी मुंबई आणि एम डी इन्फट्रचर या कंपन्यांकडून.बेकायदेशीररीत्या काम सुरू असून याचा फटका बसलेल्या माजी सैनिकांच्या मुलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दोडामार्ग तालुक्यातील सासोली हेदूसवाडी येथील प्रदीप रामचंद्र परब असे उपोषणकर्त्याचे नाव असून बेकायदेशीर सुरू असलेल्या कामाची चौकशी व्हावी आणि आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

सासोली, कमळकरवाडी, येथे तिलारी नदीवर पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी इंडियन ह्यूम पाईप कंपनी, मुंबई व एम डी इन्फ्राट्रकचर यांना ठेका दिल्याने ह्या ठिकाणी आपल्या घरांच्या समोरुन १० टन पाईप लाईन रस्त्याच्या मधोमध टाकली आहे ही पाईप लाईन तिराली नदीपर्यंत गेलेली आहे. त्यात त्यांनी पाईप लाईन पुर्णपणे दाबून बाजूला मातीचा भराव टाकल्याने पावसाळ्यात माती पाण्यामुळे रस्त्यावर आल्याने त्यात आपण दिव्यांग व्यक्ती पाय अडकुन जोरात जमिनीवर पडल्याने डोळ्याला व शरीरावर इजा झाल्याने उजवा डोळा निकामी झाला. याला जबाबदार ठेकेदार कंपनी आणि जीवन प्राधिकरण आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. याकडे आपण प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र त्यांच्याकडून काही होत नसल्याने पोलिस ठाण्यात तक्रार देखील दिली मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. याकडे पोलीस अधीक्षकांचेही लक्ष वेधले असता त्यांनी तिघांवर गुन्हा नोंद करण्यासाठी आदेश देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे अखेर आपल्याला न्याय मिळत नसल्याने आपण आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याचे प्रदीप परब यांनी सांगितले.

error: Content is protected !!