वैभववाडी (प्रतिनिधी) : गोठ्या शेजारी लागलेल्या वणव्यामुळे भुईबावडा पहिलीवाडी येथील शेतकरी सुरेश दत्ताराम मोरे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने गोठ्यात बांधलेल्या 11 म्हैशीना सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.ही घटना सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
शेतकरी चंद्रकांत मोरे यांचा दुग्ध व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे ११ म्हैसी आहेत. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गोठ्याजवळ आलेल्या वनव्याने त्यांच्या गोठ्याला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केली. आजूबाजूच्या शेजाऱ्यांसह त्यांनी गोठ्यात बांधलेल्या म्हैशीची गोठ्यातून सुखरूप सुटका केली. आग विजविण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला. मात्र आगीने उग्र रूप धारण केल्यामुळे गोठा जळून खाक झाला आहे. या वानव्यात भूषण मोरे यांची काजुची झाडे जळून खाक झाली आहेत. आगीची माहिती महसूल विभागाला देण्यात आली आहे.सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आलेला नव्हता.












