सोनाळी बौद्धवाडी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

वैभववाडी (प्रतिनिधी) : महिनाभरपूर्वी बेपत्ता झालेला सोनाळी बौद्धवाडी येथील तरुणाचा मृतदेह गळ फास घेतलेल्या अवस्थेत घरा शेजारील ओहळात आढळून आला. अंकित पांडुरंग भोसले वय २३ असे या तरुणाचे नाव आहे. त्याने नेमकी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले.

दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध करूनही तो सापडला नाही. त्यामुळे 26 फेब्रुवारी रोजी वैभववाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता खबर देण्यात आली होती.गेले महिनाभर त्यांचे नातेवाईक व वाडीतील मंडळी सर्वत्र त्याचा शोध घेत होती. मात्र त्याचा कोणताही सुगावा लागत नव्हता.सोमवारी सकाळी त्यांच्याच वाडीतील संदीप आबा भोसले यांना वाडीच्या लगत असलेल्या एका ओळात गळफास लावलेल्या स्थितीत कुजलेला मृतदेह दिसला.त्यांनी याबाबत वाडीतील लोकांना माहिती दिली.वाडीतील लोकांनी जाऊन पाहिले असता तो मृतदेह अंकित भोसले याचाच असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सागर खंडागळे,महिला पोलीस सोनाली गोसावी, प्रमिला शिंगाडे यांनी घटनास्थळीत जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अंकित भोसले हा आपल्या आई सोबत राहात होता. तर त्याचा भाऊ कामानिमित्त मुंबई येथे राहातो. आई आजारी असून ती अंथरुणावर खिळलेली आहे. तो मोलमजुरीचे मिळेल ते काम करून आई व आपला उदरनिर्वाह करीत होता. अंथरुणावर खेळलेल्या आईची सेवा तोच करीत होता. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!