वित्त विभागाचा पुस्तकांची बॅंक स्तुत्य उपक्रम आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वित्त विभागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी आणि त्यांना प्रतीक्षा कालावधीत काहीतरी वाचता यावे या हेतुने वित्त विभागाने सुरू केलेली पुस्तकांची बॅंक उपक्रम स्तुत्य असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी पुस्तकांची बँक शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या वतीने पुस्तकांची बँक सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा वित्त विभागात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या ज्ञानांत भर पडण्यासाठी होणार आहे. तसेच काही वेळा वित्त विभागात बैठका असतात व्हिडिओ कॉन्फरन असते त्यावेळी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. यावेळी त्यांना या पुस्तक बँकेचे मोठा फायदा होणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बँकेचं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या शुभहस्ते आज उद्घाटन करण्यात आले . यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, वित्त विभाग अधिकारी…. तसेच सामान्य प्रशासनाचे अधिकारी,खातेप्रमुख उपस्थित होते. यासह वित्त विभाग कर्मचारी ही सहभागी होते.

error: Content is protected !!