वैभववाडी (प्रतिनिधी) : संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुभाष कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भिमाचा किल्ला या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही निवड घोषित करण्यात आली.
यावेळी संविधान सैनिक संघांचे संस्थापक डॉ.रवींद्र जाधव,गृह मंत्रालयाचे उपसचिव मनोज जाधव, मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त उपमुख्य अभियंता संजय जाधव, संगीतकार, गीतकार दत्ता जाधव,ओबीसी समाज नेते कुणाल भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.सुभाष कांबळे हे वेंगसर गावचे सुपुत्र असून त्यांनी वेंगसर गावचे सरपंच म्हणून काम केले आहे. तसेच वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे विद्यमान कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.जिल्ह्यातील सामाजिक चळवळीत गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. विविध सामाजिक संघटनामध्ये ते सक्रिय आहेत.पाच वर्षे ते संविधान सैनिक संघटनेचे संस्थापक डॉ. रवींद्र जाधव यांच्या समवेत काम करीत आहेत. संविधान सैनिक संघ या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दाखल घेत. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपावली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.












