आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून तोंडवळी तळाशीलच्या विकासासाठी कटीबद्ध…!

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे तळाशील ग्रामस्थांना आश्वासन

स्वखर्चाने १२०० मिटर रस्ता डांबरीकरण करून देण्याचाही दिला शब्द

आचरा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघा सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पुढील पाच वर्षात गतिमान होणार आहे. प्रत्येक गाव विकासाच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्यात येत आहे. एका बाजूने समुद्र व दुसऱ्या बाजूने खाडीने वेढलेल्या तोंडवळी तळाशीलच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही कटीबद्ध आहोत. गाव विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या मागण्या आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्य क्रमाने सोडवल्या जातील.असा शब्द शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी तळाशील ग्रामस्थांना दिला.

दरम्यान, गावात येणारा मुख्य रस्ता मोठया प्रमाणात खड्डेमय बनला आहे. जो भाग अधिक खड्डेमय आहे त्यापैकी सुमारे 1200 मिटर रस्ता 15 मे पूर्वी स्वखर्चाने डांबरीकरण करून देऊ. असा शब्द दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिला. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांच्या भूमिकेचे टाळ्या वाजवून उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी ग्रामस्थानीही आपल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. 1990 साली राणे साहेब आमदार, मंत्री झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने निधीचा ओघ वाढला, कोकणचा विकास झाला. असे जयहरी कोचरेकर यांनी सांगितले. तर तोंडवळी तळाशील गावचा विकास राणे साहेबांच्या हातूनच होणार. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यात महत्वाची भुमिका बजावतील असा ठाम विश्वास संजय गोविंद तारी यांनी व्यक्त केला. तर संजय केळूसकर यांनी विकासाच्या अनेक मांगण्या व भेडसावणाऱ्या समस्या मांडताना या सर्व शासनाच्या माध्यमातून सोडवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली.

तळाशील ग्रामस्थांनी श्री गोपाळकृष्णमंदिर येथे एकत्र येत आपल्या विविध मागणण्यांचे निवेदन तळाशील ग्राम विकास मंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना दिले. यावेळी दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संजय केळूसकर, सल्लागार जयहरी कोचरेकर, संजय गोविंद तारी, ग्रामपंचायत सदस्य भूपाळ मालंडकर, संजय अं. तारी, धर्माजी कोचरेकर, दशरथ कोचरेकर, नागेश कोचरेकर, बाबू रेवंडकर, धर्माजी रेवंडकर, केशर जुवाटकर, हर्षल केळुसकर, रवी कोचरेकर, अजित केणी यांसह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच दत्ता सामंत यांच्या सोबत माजी नगरसेवक दीपक पाटकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, डॉ. प्रमोद कोळंबकर, भाऊ मोरजे, मंदार लुडबे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!