निर्मात्या सरोज विठ्ठल सावंत; लेखक विठ्ठल दामोदर सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन
सर्वोत्कृष्ट अभिनेता,सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि सर्वोत्कृष्ट नाटक अशा बक्षीसांची केली लयलूट
कणकवली (प्रतिनिधी) : 4 एप्रिल 2025 हा दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मालवणी भाषेला साता समुद्रापार पोहोचवणारे आपले बापूजी म्हणजेच कै. मच्छिंद्रनाथ कांबळी आणि त्याच मालवणी भाषेला तसेच नाट्यकर्मींना रंगकर्मींना हक्काचा व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील केळुस कालवी बंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई उत्सव कमिटी व ग्रामस्थ कालवी बंदर दरवर्षीप्रमाणे श्रीराम नवमी महोत्सव 2025 आणि त्यानिमित्त भव्य राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि याही वर्षी त्या ठिकाणी एकूण सात नाटकांचे सादरीकरण झाले. त्यामध्ये आपल्या कणकवलीतील उगवाई कलारंग फोंडाघाट कणकवली सिंधुदुर्ग या संस्थेच्या “जापसाल” या नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. निर्मात्या सौ.सरोज विठ्ठल सावंत लेखक श्री. विठ्ठल दामोदर सावंत यांच्या बहुमोल अशा मार्गदर्शनाखाली नव्या नवख्या संचात प्रेक्षक वर्गाच्या मनात घर करणार, हसायला ,रडायला भाग पाडणार असं “जापसाल” हे मालवणी बोली भाषेतील नाटक सादर झालं आणि यामध्ये दारिस्ते गावचा सुपुत्र कु. सत्यवान गावकर यास सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालं. तसेच शेखर मनोहर गवस यांस सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालं. तसेच या नाटकाकरिता पार्श्व संगीताची बाजू सांभाळणारे चैतन्य पावस्कर, हितेश पिळणकर, पार्थ कोरडे, शेखर गवस, आयुष सावंत यास सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालं .
माणसाला रुचेल एवढेच बोलावं परंतु खरंच माणसाला हिणवलं आणि एखाद्या माणसाने एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर माणूस काहीही करू शकतो मकरंद हडकर एका गरीब कुटुंबातील मुलगा. सोबत त्याचा लहान भाऊ, आई एवढेच कुटुंब छोटी मोठी काम करून घर चालवणारा घरातील सर्वात मोठा मुलगा असल्यामुळे जबाबदाऱ्यांच ओझ परंतु घरात पहिल्यापासूनच दशावतारी नाटकाचा व्यासंग असल्याने वडिलांच्या पश्चात त्यालाही नाटकाची गोडी लागते .परंतु या गोष्टी त्याच्या आईला म्हणजेच सत्यभामा हिला आवडत नसते. आणि या दरम्यानच गावच्या आई पावणाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव जवळ येतो त्यानिमित्त देवीला कौल जापसाल लावले जातात. कार्यक्रमाचे रूपरेषा आखली जाते आणि त्याच गावातील आप्पा म्हणजेच मंदिराचे मानकरी त्यांच्या मुलीवर शुभांगी वर मकरंदचा जीव जडतो परंतु आप्पांचा याला विरोध असतो. दोघही आपल्या निर्णयावर ठाम राहून लग्न करण्याचा निर्णय घेतात.शेवटी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करतात. आप्पांनी चार चौघात हिणवल्यामुळे मकरंद ठरवतो की आता पैसा,पैसा आणि फक्त पैसा कमवायचा. दाजी मंदिराचे दोन नंबरचे मानकरी आणि तीन नंबरचे मानकरी धोंडू ते देखील समजावण्याचा प्रयत्न करतात. परंतु आप्पा मानकरी पद सोडून घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी सुखवस्तीसाठी जातात. मकरंद निर्णय घेतो की ,आता सगळं सोडून आपण मुंबईला जायचं काम करायचं पैसा कमवायचा आणि दाखवून द्यायचं की हा मकरंद हडकर भिकारी नव्हे. मुंबईला जाऊन पैसे कमावण्याच्या नादात त्याचे पाय नको त्या गोष्टीत अडकत जातात. तीन ते चार वर्ष गावी न आल्यामुळे बायको खूप व्याकुळ आहे. बरीच भेटण्याची इच्छा असून सुद्धा भेटता येत नाही आहे ती सर्वांना विचारत असते की कुठे असतात? काय करतात? परंतु त्याचे उत्तर कोणीही शुभांगीला दिलेलं नसतं त्यामुळे ती आपल्या दिराजवळ शैलेश जवळ विचारणा करते त्यातच तीन ते चार वर्ष मुलीचं तोंड न बघलेला तिचा बाप म्हणजेच आप्पा जत्रेच्या निमित्ताने भेटण्याकरिता येतात. आणि सर्व हकीगत सांगतात शुभांगीचा जीव कासावीस होतो आणि तिच्या दिराजवळून कळतं की आजच्या रात्री मकरंद तिला भेटायला येणार आहे. आणि ज्या क्षणी त्या दोघांचे भेट होते त्याक्षणी मकरंद आपण कशा पद्धतीने पैसा कमावण्याच्या नादात नको त्या वाईट धंद्यामध्ये अडकत गेलो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या टोळीतील गुंडाचा खून करून माफीचा साक्षीदार म्हणून बाहेर येऊन नवीन आयुष्य सुरू करू असे आपल्या बायकोला म्हणजे शुभांगी ला सांगतो. त्याचवेळी त्याच्या टोळीतील गुंड त्याच्यावर गोळी झाडतात आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडतो आणि त्या क्षणी मंदिरात जाबसाल चालू होतात. जापसाल म्हणजे माणसाच्या भल्यासाठी देवीकडे 12 पाचाने एकत्रित येऊन केलेले गाऱ्हाणे होय. मात्र ज्याची कर्म वाईट आहे त्याला त्याच पद्धतीने फळ मिळते.अक्षरशः प्रेक्षक वर्गाच्या काळजाचा ठाव घेणारे आणि संपूर्ण दोन तास जागेवर खेळवून ठेवणारे मालवणी भाषेतील जबरदस्त नाटक “जापसाल ” एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात दिग्दर्शक शेखर मनोहर गवस कमालीचे यशस्वी झाले आहेत आणि मालवणी भाषा प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचवणारे लेखक श्री विठ्ठल दामोदर सावंत यांनी देखील कोकणातील जीवन व्यवस्थेचे यथार्थ दर्शन आपल्या लेखणीतून मांडलेले आहे. कोकणातील नवीन दमाच्या नवख्या कलाकारांना अतिशय विश्वासाने भक्कम आर्थिक पाठबळ दिले आहे ते कोकणातीलच फोंडा या गावातील राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ सरोज विठ्ठल सावंत.
नवरा मुंबईत असून घरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली शुभांगी म्हणजेच विद्या चव्हाण यांनी आपल्या भूमिकेतून जिवंतपणा आणला आहे.आपल्याच घराची आई,आजी वाटणारी सत्यभामा म्हणजेच फोंड्याची कोमल मेस्त्री तिने खूप छान तसेच प्रेमळ सासु रंगवली आहे. प्रत्येकाला आपलासा वाटणारा भाऊ शैलेश म्हणजेच चेतन वरक त्याने आपला अभिनय उत्तम केला आहे.प्रत्येकाच्या मागे त्याचा एक मित्र उभा असतो व नाटकातील रामा म्हणजेच फोंड्याचा आयुष्य सावंत त्याने देखील अभिनय सुंदर केला आहे.शैलेश वर जीवापाड प्रेम करणारे त्याची प्रेयसी रजग्या योगेश्वरी केळुसकर , देवस्थानचे मानकरी दाजी म्हणजेच कृष्णा तळाशीलकर, धोंडू सिद्धेश म्हसकर बेरकीपणातून उत्तम पात्र रंगवली आहे.आप्पा श्री शेखर मनोहर गवस यांनी नाटकाला अक्षरशा चार चांद लावले. अतिशय खरी खरी वाटावी इतकी सुंदर पात्र या कलाकारांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहेत हे या नाटकाचे यश आहे.
यातील संगीताची बाजू चैतन्य पावसकर, हितेश पिळणकर, पार्थ कोरडे, शेखर गवस, आयुष सावंत यांनी सांभाळली होती संगीताच्या दृष्टीने मालवणी दशावतार या दुनियेत सहजपणे गेल्यासारखे वाटते .तसेच समर्पक अशी प्रकाशयोजना ऋषिकेश उर्फ दादा कोरडे यांनी केली होती. सलग दुसऱ्या वर्षी देखील दिग्दर्शक शेखर गवस यांच्या दिग्दर्शनातून विजेतेपदाचे मानकरी ठरलेत उगवाई कलारंग फोंडाघाट त्याकरिता जापसाल टीमवर, कलाकारांवर तंत्रज्ञ तसेच सर्वांवर कणकवली तालुक्यामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



