३३ विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण
कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची विशेष उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म. विद्यालय व जुनियर कॉलेज खारेपाटण आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१७ एप्रिल २०२५ रोजी विद्यार्थ्यांना लागणारे विविध शैक्षणिक व प्रशासकीय दाखले काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 33 विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या शिबिरासाठी कणकवली तहसीलदार – दीक्षांत देशपांडे, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, तहसील कार्यालय कर्मचारी विलास पाटील, ग्राम महसूल अधिकारी खारेपाटण प्रविण लुडबे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव – महेश कोळसुलकर, संचालक योगेश गोडवे, मोहन कावळे,प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, ग्राम महसूल अधिकारी वारगांव रविंद्र आमडोसकर, ग्राम महसूल अधिकारी नडगिवे विकास चाळके, ग्राम महसूल अधिकारी शेर्पे, अनघा अग्निहोत्री, पोलिस पाटील शिवाजी पेठ अनिकेत जामसंडेकर, पोलिस पाटील संभाजीनगर भिकाजी चव्हाण, पोलिस पाटील नडगिवे, जितेंद्र मण्यार, पोलिस पाटील चिंचवली भालेकर व पंचक्रोशीतील पालक वर्ग उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी केंद्र खारेपाट्ण चे संचालक भूषण कांबळे आणि त्यांचे सहकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

