खारेपाटण गावचा सुपुत्र अथर्व अवधूत गोडवे याचे कला क्षेत्रामध्ये उत्तुंग यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण बंदरवाडी या गावचा सुपुत्र असलेला कुमार अथर्व अवधूत गोडवे याने कला क्षेत्रातील UCEED या देशव्यापी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशात ३० वां क्रमांक प्राप्त केला आहे.कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथून असे यश प्राप्त करणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या कला क्षेत्रातील उतुंग या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

यानिमित्ताने अथर्व गोडवे ला IIT मुंबई, दिल्ली, हैद्राबाद तसेच अनंत अंबानी कॅम्पस अहमदाबाद येथे पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.कोरोना काळात स्वकर्तृत्वावर कला क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अथर्व ने १० वी च्या परीक्षेत ९३% गुण प्राप्त करून शालेय शिक्षणात ही कौतुकास्पद यश मिळवले परंतु आर्ट, ड्रॉइंग ची प्रचंड आवड असल्याने तेच आपले करिअर निवडून कोल्हापूर येथे BRDS मध्ये पदविका शिक्षण पूर्ण केले. या कालावधी मध्ये अथर्वचे २ वेळा मुंबई येथे आर्ट गॅलरी मध्ये पोर्ट्रेट झळकले. आणि त्यानंतर मुंबई व गोवा येथे झालेल्या पदवी प्रवेश परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले.देशभरात ३० वा क्रमांक प्राप्त केलेल्या अथर्व चे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. कुमार अथर्व अवधूत गोडवे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण च्या वतीने नुकतेच त्याचे संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्था उपाध्यक्ष भाऊ राणे सचिव – महेश कोळसुलकर व संस्था विश्वस्त तसेच प्रशालेचे प्राचार्य संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत यांसह अथर्व अवधूत गोडवे याचे पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!