कणकवली पं. स. सभापती हर्षदा वाळके यांनी खारेपाटण विभागातील भातशेती नुकसानाची केली पाहणी

जि. प. सदस्य प्राची इस्वलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, राजेश जाधव यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कणकवली पं.स. सभापती हर्षदा वाळके यांनी गुरुवार दि.१ ऑक्टोबर २०२६ रोजी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील साळीस्ते या गावातील शेतकरी बांधवांच्या भातशेती नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य प्राची ईस्वलकर, पं.स. सदस्य राजेश जाधव, पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे उपस्थित होते. संपूर्ण राज्यात सुका दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्याच्या यामध्ये समावेश आहे. त्यामुळे लोकप्रतनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भातशेतीचे पाहणी करत आहेत.

साळीस्ते येथे कणकवली सभापती हर्षदा वाळके यांच्या पीक पाणी नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रामसेवक पेडणेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी ग्रामस्थ यांसह कृषी अधिकारी व तलाठी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय साळीस्ते येथे झालेल्या चर्चेत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी सभापती वाळके यांनीं संवाद साधल. व शेतकऱ्यांना दिलासा दिला.

error: Content is protected !!