कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ रोजी रक्तदान शिबीर

कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभर १७ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबविले जात आहे. या अभियानंतर्गत महाराष्टÑ शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे बुधवार १४ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते १ यावेळेत येथील उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष क्रमांक २९ येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात जास्तीत दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी केले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी प्रशांत बुचडे, सुशील परब यांच्याकडे संपर्क साधावा.

error: Content is protected !!