खारेपाटण सह विभागातील साळीस्ते, शेर्पे, कुरंगावणे, नडगिवे, चिंचवली घेतल्या शेतकऱ्यांच्या भेटी
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर तसेच पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे व राजेश जाधव यांनी सध्या महाराष्ट्र राज्यात उद्भभवलेल्या कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण विभागातील चिंचवली, नडगीवे, शेर्पे, कुरंगावणे, साळीस्ते व खारेपाटण या भागातील भातशेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकतीच पाहणी केली.
यावेळी भाजप शक्ती केंद्र प्रमुख, सूर्यकांत भालेकर, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, नडगिवे सरपंच भूषण कांबळे, कुरंगावणे सरपंच संतोष ब्रम्हदंडे, माजी उपसरपंच बबलू पवार,शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ,माजी सरपंच निशा गुरव, चिंचवली सरपंच अशोक पाटील, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, यांसह कृषी अधिकारी,तलाठी व ग्रामसेवक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. या पाहणी दरम्यान शेतकरी वर्गाच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या.तर कोकणातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथील शेतकऱ्यांना शासन स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर यांनी सांगितले.

















