माजी ग्रामविकास अधिकारी तथा माजी सैनिक मनोहर नारायण उर्फ भाई मडव यांचे निधन

कुडाळ (प्रतिनिधी) : माजी सैनिक दिवंगत मनोहर नारायण मडव (भाई मडव) वय 85 गाव जांभवडे ता. कुडाळ यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. माजी ग्रामविकास अधिकारी म्हणून 25 वर्षे सेवा करून निवृत्त झालेले.नोकरीच्या काळात त्यांनी घोटगे,कुपवडे, सोनवडे,नरडवे,भरणी,रांगणा तुळसुली, निवजे,दारिस्ते, किंजवडे, तोरसोळे या गावात रस्ते, शाळा, वीज, पाणी, अशी अत्यावश्यक कामे तसेच तोरसोळे देवगड येथे शेती मधील पॅडीपायलट योजना राबवून प्रथम क्रमांक आणि नरडवे, दारिस्ते येथे बायोगॅस प्रकल्प आणि कुटुंब कल्याण कामाबद्दल द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला होता.

निवृत्तीनंतर जांभवडे या गावी उपसरपंच म्हणून 5 वर्ष काम केले. या काळात त्यांनी नळ योजनेसह अनेक विकास कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण केली. चीन बरोबर च्या 1962 लढाईत ते बॉर्डरवर कार्यरत होते. हिंदी प्रबोद व drawing इलिमेंटरी इंटरमिजीट परीक्षा उत्तीर्ण असल्याने त्यांनी 4 वर्षाची इलेट्रिक इंजिनिअरिंग पदवी पूर्ण केली. नंतर त्यांनी सेंटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग टीम मध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम केले.

अशा कुशाग्र बुद्धीच्या, मनमिळाऊ, धाडसी स्वभाव असणारे भाई यांच्या निधनाने सर्वांचा आधारवड हरपला.त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आणि निरपेक्ष समाजसेवने त्यांनी असंख्य माणसे जोडली.म्हणूनच त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुन्हा अशी व्यक्ती होणे नाही अशा भावना व्यक्त केल्या.

त्यांची पत्नी तिलोत्तमा मडव यांचे 2 महिन्यापूर्वीच निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, जावई, सुना,भाऊ,पुतणे नातवंडे,नातजावई,नातसुना,असा मोठा परिवार आहे.ग्रामपंचायत सदस्य उदय मडव आणि नारायण मडव कृषी अधिकारी, लतिका नाईक- पं.स कणकवली,माया वंजारे, दया पवार यांचे वडील असून गितांजली नाईक सावंत प्रशासकीय अधिकारी यांचे ते आजोबा आहेत.

error: Content is protected !!