तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची चमकदार कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेच्या 19 वर्षाखालील मुलांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर बाजी मारली अंतिम फेरीत कणकवली कॉलेज कणकवली या संघासोबत विजय मिळवत त्यांनी विजेतेपद मिळवले. तर याच स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर झेप घेतली आहे. 17 वर्षाखालील मुलांच्या गटाने अंतिम फेरीत पोदार इंटरनॅशनल स्कूल या प्रशाले विरुद्ध विजय मिळवत जिल्हास्तरावर दिमाखात प्रवेश मिळवला.

हे दोन्हीही संघ येत्या रविवारी माणगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत कणकवली तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत.
याच स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांचा गट उपविजेता ठरला.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम सल्लागार श्री. डी. पी. तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम,तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व मुलांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

error: Content is protected !!