दुष्काळी भातशेतीच्या पाहणीसाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तरंदळेत भातशेतीची पाहणी ; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना

कणकवली (प्रतिनिधी) : यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा मोठा फटका भातशेतीला बसत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कणकवली पंचायत समिती प्रशासनाने तरंदळे गावातील भातशेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रुहिता तांबे,कणकवली पंचायत समिती सदस्य संजना राणे, तरंदळे सरपंच सुशिल कदम,माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत,डॉ.सत्यवान राणे,ग्रामपंचायत अधिकारी रेश्मा माळकर,कृषी सेविका सोनिया चव्हाण यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तरंदळे गावातील भातशेतीची पाहणी केली.

यावेळी अपुऱ्या पावसामुळे करपून गेलेल्या भातपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी झाल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!