मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर यांच्या हस्ते वितरण
कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पंचायत दिवसाच्या निमित्ताने ग्रामपंचायत हुंबरट ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग ला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सन 2023/24 जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी काळे मान. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. पु. स्व.) परब यांचे हस्ते वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार मनीषा मनोहर गुरव सरपंच, वैभव वसंत ठाकूर ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वीकारला.
तसेच मान. गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली श्री. अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी श्री. सूर्यकांत वारंग यांनीही सदर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत ला शुभेच्छा दिल्या












