मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर यांच्या हस्ते सरपंच भूषण पोकळे यांनी स्वीकारला पुरस्कार
देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन २०२३- २४ चा स्वर्गीय आप्पासाहेब खेडकर जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देवगड तालुक्यातील पडेल ग्रामपंचायत ला प्रदान करण्यात आला. पंचायत राज दिवसाच्या औचित्यावर २४ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांच्या हस्ते पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमुख्य कार्यकारी श्री.काळे उपस्थित होतें. हा पुरस्कार हा समस्त पडेल ग्रामस्थांचा आहे. पडेलवासियांनी घर तिथे शौचालय हे ग्रामपंचायती चे म्हणणे समजून घेत प्रतिसाद दिला. त्यामुळेच आज पडेल गावात प्रत्येक घरात शौचालय आहे. म्हणूनच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पडेल ग्रामपंचायतीला मिळाल्याची प्रतिक्रिया सरपंच भूषण पोकळे यांनी दिली.













