संच मान्यतेचा आदेश म्हणजे शिक्षण हक्क कायद्याला छेद – नंदकुमार राणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : संच मान्यतेचा 15/03/2024 चा आदेश म्हणजे शिक्षण हक्क कायद्याला छेद देणार आदेश आहे.  हा आदेश काढण्याचा अधिकार शासनालाही नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला जात असून  या शाळा खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे भविष्यकाळात शिक्षकांसमोर येणाऱ्या आव्हानांना सामोरे जायचे असेल तर संघटना ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन शिक्षक नेते, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे यांनी केले.    

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वैभववाडीचे त्रैवार्षिक अधिवेशन वैभववाडी अध्यक्ष रफिक बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली माधवराव पवार विद्यालय कोकिसरे येथे संपन्न झाले. यावेळी संघटना काळाची गरज या विषयावर नंदकुमार राणे यांनी मार्गदर्शन केले. तर सुनील चव्हाण यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.      यावेळी गटविकास अधिकारी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी अशोक वडर, रुचिता कदम, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सचिव तुषार ओरोसकर, सुरेखा कदम, महिला आघाडी अध्यक्ष निकिता ठाकूर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, चंद्रकांत आणावकर, नंदकुमार राणे,सुनील चव्हाण, राज्य कार्यकारणी सदस्य नामदेव जांभवडेकर,सचिन मदने, संतोष परब,पतपेढी उपाध्यक्ष ऋतुजा जंगले,संचालक नारायण नाईक,संतोष राणे,सिताराम लांबर,मंगेश कांबळी,श्रीकृष्ण कांबळी,चंद्रसेन पाताडे, सचिन बेर्डे संजय पवार,महेंद्र पावसकर,संतोष मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.    तालुक्यातील 11 केंद्रातील 22 गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या 23 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आला. गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेले शिक्षक विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक पदोन्नती धारक शिक्षक यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.    

त्याचप्रमाणे सलग दुसऱ्यांदा शिक्षापेढीवर संचालक म्हणून निवडून आलेले संतोष मोरे यांचा तसेच वैभववाडी शाखेला अत्यंत उत्कृष्ट शाखा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. पंचवार्षिक निवडणुकीत संघटनेच्या भाग्यलक्ष्मी पॅनलने भौगवीत यश संपादन करून शिक्षक पतसंस्थेत पंधरा पैकी 13 सदस्य निवडून आणले या सर्व सदस्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षक समितीची नवीन कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत मोरे प्रास्ताविक अध्यक्ष रफिक बोबडे, अहवाल वाचन महादेव शेटे यांनी तर आभार सुधीर गोसावी यांनी मानले.

error: Content is protected !!