कणकवली (प्रतिनिधी) : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे जी इस्लामी आतंकवाद्यांनी २६ निरपराध हिंदूंची हत्या केली. या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व हिंदु बांधव तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने शुक्रवार दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पटवर्धन चौकात पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारो आंदोलन करून तो जाळून निषेध नोंदवण्यात येणार आहे. सर्व हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कणकवली तालुका सकल हिंदु समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्याचा उद्या कणकवली पटवर्धन चौकात निषेध












